Advertisement

मुंबई गेटवे ते मांडवा या जलमार्गावरची प्रवासी वाहतूक सेवा तीन महिने बंद

आता मांडवाहून (Alibaug News) मुंबईला येणाऱ्यांना रस्ते मार्गानेच मुंबई गाठावी लागणार आहे.

मुंबई गेटवे ते मांडवा या जलमार्गावरची प्रवासी वाहतूक सेवा तीन महिने बंद
SHARES

पावसाळा सुरू होणार असल्यानं मुंबई गेटवे ते मांडवा या जलमार्गावरची प्रवासी वाहतूक सेवा तीन महिने बंद ठेवण्यात येणार आहे. 26 मे ते 31 ऑगस्टदरम्यान प्रवासी जलवाहतूक बंद ठेवली जाते. त्यामुळे आता मांडवाहून (Alibaug News) मुंबईला येणाऱ्यांना रस्ते मार्गानेच मुंबई गाठावी लागणार आहे.

महाराष्ट्र सागरी मंडळ विभागाने प्रवासी जलवाहतूक कंपन्यांना ही वाहतूक बंद (Sea Traveling) ठेवण्याबाबत पत्र दिलं आहे. खबरदारी म्हणून पावसाळ्यात जलवाहतूक बंद ठेवली जाते. त्यानुसार 26 मे पासून 31 ऑगस्टपर्यंत ही वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

पीएनपी, मालदार, अजंठा, अपोले या कंपन्यांच्या बोटी मांडवा ते गेट वे जलवाहतूक मार्गावर प्रवासी सेवा देतात. पावसाळ्याचे चार महिने ही सेवा बंद केली होते. पुढच्या आठ दिवसांनी ही जलवाहतूक खबरदारीच्या कारणास्तव बंद करण्यात येणार आहे.

पावसाळ्यात बंद राहणाऱ्या या जलवाहतुकीचा परिणाम अलिबाग आणि रायगडमधील पर्यटनावरही होतो. मुंबईकरांची मांडवा किनाऱ्याला पर्यटनासाठी पसंती असते. मांडवा इथं पर्यटनाच्या दृष्टीनं अनेक गोष्टींचा विकास झाला आहे.हेही वाचा

मुंबईतल्या पुराचा अलर्ट BMCकडून थेट मोबाईलवर!

केवळ 39 टक्के नाले साफ, विरोधकांचा पालिकेवर आरोप

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा