Advertisement

राजभवनात कोरोनाचा शिरकाव! राज्यपाल झाले क्वारंटाईन

महाराष्ट्रातील राज्यपालांचं निवासस्थान असलेल्या राजभवनातील तब्बल १८ कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत.

राजभवनात कोरोनाचा शिरकाव! राज्यपाल झाले क्वारंटाईन
SHARES

महाराष्ट्रातील राज्यपालांचं निवासस्थान असलेल्या राजभवनातील तब्बल १८ कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. तर अजून ५७ कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचणीचे रिपाेर्ट हाती यायचे आहेत. राजभवनातील एवढ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी क्वॉरंटाईन झाले आहेत.

राजभवनात एका इलेक्ट्रिशियनला खोकला आणि ताप आला होता. त्यामुळे त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीत संबंधित कर्मचाऱ्याला कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे त्याच्या संपर्कात असलेल्या राजभवनातील इतर १०० कर्मचाऱ्यांची देखील कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीत १८ जणांना करोनाची लागण झाल्याचं निदान झालं आहे. तर ५७ कर्मचाऱ्यांचे कोरोना चाचणी अहवाल हाती यायचे आहेत. एकाच वेळी राजभवनातील १८ कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आल्याने सावधगिरीचा उपाय म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी क्वॉरंटाइन झाले आहेत. त्यांचीही कोरोना चाचणी करण्यात येणार असून राजभवनानं सॅनिटाइझेशन करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

 दरम्यान, राज्यात शनिवार ११ जुलै रोजी कोरोनाच्या ८१३९ नवीन रुग्णांचे निदान झालं. यामुळे सध्या राज्यात ९९ हजार २०२ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १२ लाख  ८५ हजार ९९१ नमुन्यांपैकी २ लाख ४६ हजार ६०० नमुने पॉझिटिव्ह (१९.१७ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ८० हजार १७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४७ हजार ३७६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात शनिवारी २२३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४.१ टक्के एवढा आहे.
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा