चेंबूरमध्ये तरुणांसाठी रोजगार मेळावा

 Chembur
चेंबूरमध्ये तरुणांसाठी रोजगार मेळावा
Chembur, Mumbai  -  

चांगल्या कंपन्यांमध्ये तरुणांना नोकरीची संधी मिळावी यासाठी चेंबूर प्रतिष्ठान आणि युवा शक्ती प्रतिष्ठान यांच्या वतीने शनिवारी चेंबूरच्या सत्यभामा हॉल येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विविध बँका, मोबईल कंपन्या, जाहिरात कंपन्या अशा एकूण 31 कंपन्यांचे प्रतिनिधी याठिकाणी दाखल झाले होते. तरुण-तरुणींनी देखील याला मोठा प्रतिसाद दिला होता. चेंबूरसह घाटकोपर, नवीमुंबई आणि ठाणे परिसरातून 843 जणांनी या ठिकाणी हजेरी लावत विविध कंपन्यांना आपला परिचय दिला. यातील काही निवडक तरुणांना तत्काळ कंपन्यांनी नोकरीवर घेतले आहे. चेंबूर प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि भाजपाचे नगरसेवक महादेव शिगवण यांच्याकडून दर तीन महिन्यांतून अशा प्रकारे रोजगार मेळावे घेण्यात येत आहेत. त्यामुळे अनेक बेरोजगारांना नोकऱ्या मिळाल्या असून अशाच प्रकारे हे कार्य पुढे देखील सुरु ठेवणार असल्याचे यावेळी शिगवण यांनी सांगितले.

Loading Comments