Advertisement

चैत्यभूमी येथील व्हिविंग गॅलरीचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंच्या हस्ते उद्धाटन

दादर चौपाची इथं उभारण्यात आलेल्या व्हिविंग गॅलरीचं 'माता रमाबाई स्मृती व्हिविंग डेक' असं नामकरण करण्यात आलं.

चैत्यभूमी येथील व्हिविंग गॅलरीचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंच्या हस्ते उद्धाटन
SHARES

दादर शिवाजी पार्क इथं समुद्राला लागून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक असलेली चैत्यभूमी आहे. या चैत्यभूमीला लागूनच समुद्रात बांधकाम करून व्हिविंग गॅलरी उभारण्यात आली आहे. या व्हिविंग गॅलरीचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याहस्ते बुधवारी उद्धाटन करण्यात आले.

दादर चौपाची इथं उभारण्यात आलेल्या व्हिविंग गॅलरीचं 'माता रमाबाई स्मृती व्हिविंग डेक' असं नामकरण करण्यात आलं. बुधवारी सकाळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थिती या गॅलरीचे उद्धाटन करण्यात आलं. यावेळी स्थानिक आमदार सदा सरवणकर, पालिका सभागृह नेत्या विशाखा राऊत आणि अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

शिवाजी पार्क आणि दादर चौपाटी इथं येणाऱ्या अनेक मुंबईकरांसह पर्यटकांना एक आकर्षित करण्यासाठी या गॅलरीचे बांधकाम करण्यात आलं आहे. तसंच, चैत्यभूमी इथं येणाऱ्या लोकांना बसण्यासाठी व वावरण्याकरीता योग्य जागा नव्हती. मात्र, या व्हिविंग गॅलरीमुळे त्यांच्या हा प्रश्न सुटणार असल्याचं पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

''मुंबई जवळपास ४० ते ५० असे स्ट्रोम वॉटर ड्रेनेजचे आउटसोर्स आहेत. या गॅलरीप्रमाणे नरिमन जेट्टी, वाळकेश्वर याठिकाणी असे काम सुरू आहे. मुंबईत ४० ते ४४ असे परिसर आहेत. याठिकाणी अशाच प्रकारते सुशोभिकरण केल जात आहे. याठिकाणी लोकांना बसण्यासाठी, फिरण्यासाठी व्यवस्था असेल'' असं पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.


गॅलरीचे वैशिष्ट्य

  • 'माता रमाबाई स्मृती व्हिविंग डेक' या व्हिविंग गॅलरीला भेट देणाऱ्या लाखो लोकांना समुद्र किनारा आणि सिलिंकसोबत सेल्फी काढता येईल.
  • या गॅलरीमध्ये बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
  • विविध जातीच्या फुलांनी ही गॅलरी सजवण्यात आली आहे.

का उभारली व्हिविंग गॅलरी

दादर चैत्यभूमी इथं मुंबई महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाची मल विसर्ग वाहिनी आहे. या वाहिनीची डागडुजी केली जात नसल्यानं विसर्ग वाहिनीची अवस्था दयनीय झाली आहे. या वाहिनीतून मिलमधील पाणी समुद्रात सोडले जात होते. मिल बंद असल्याने या विसर्ग वाहिनीचा काहीही उपयोग होत नाही.

शिवाजी पार्क येथील समुद्र किनारी भेट देणारे लोक या विसर्ग वाहिनीवर येऊन बसतात. या कारणाने विसर्ग वाहिनीचे नुकसान होत आहे. पर्यटक या विसर्ग वाहिनीवरून चालत जाऊन फोटो काढतात त्याठिकाणी बसतात. यामुळे पर्यटक समुद्रात पडून पर्यटकांच्या तसेच विसर्ग वहिनीची सुरक्षा धोक्यात आली आहे.

या ठिकाणी विसर्ग वाहिनीतील घाण समुद्र किनारी साचत असल्याने समुद्र किनारी अस्वच्छता दिसून येत आहे. समुद्र किनारा स्वच्छ दिसावा आणि व्हिविंग गॅलरी बांधल्याने विसर्ग वाहिनीची सुरक्षा व्हावी, म्हणून व्हिविंग गॅलरी बनवण्यात आली आहे.

व्हिविंग गॅलरी रचना -

  • गॅलरीचे काम करताना पायलिंग आणि आरसीसीचे काम करण्यात आलं आहे. 
  • गॅलरीच्या ३ बाजूला लोखंडी जाळ्या लावण्यात आल्या आहेत. 
  • गॅलरीवर कोणी घसरून पडू नयेत यासाठी पेव्हर ब्लॉक लावण्यात आले आहेत. 
Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा