Advertisement

धारावीतील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ

कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीतही रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.

धारावीतील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ
SHARES

मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशातच कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीतही रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. धारावीत पुन्हा दर दिवशी ५० पेक्षा जास्त रुग्ण सापडू लागले आहेत. त्यामुळं महापालिकेनं उपाययोजना सुरू केल्या असून, लसीकरणावर अधिक भर दिला जात आहे. खास धारावीसाठी तयार करण्यात आलेल्या लसीकरण केंद्रावर आतापर्यंत ४२४ लोकांनी लस घेतली आहे.

मुंबईत गेल्या आठवड्यापासून मोठ्या संख्येनं रुग्णसंख्या वाढू लागली आहे. गेल्या वर्षभरातील दैनंदिन रुग्णसंख्येचा उच्चांक मोडीत काढत बाधितांची संख्या सतत वाढत आहे. गेल्या वर्षी कोरोनाचे अतिसंक्रमित क्षेत्र म्हणून ओळख झालेल्या धारावीतही रुग्णसंख्या वाढू लागली आहे. जी उत्तर विभागांतर्गत धारावी, दादर आणि माहीम हे परिसर येतात. त्यापैकी माहीम परिसरात धारावीपेक्षाही अधिक रुग्ण आढळून येत आहे.

धारावीतील नागरी आरोग्य केंद्रातही लसीकरणाला २२ मार्चपासून सुरुवात झाली आहे. या केंद्रावर दिवसाला १ हजार लोकांचं लसीकरण करण्याची क्षमता आहे. मात्र, मागील ३ दिवसांत या ठिकाणी ४२४ लोकांचे लसीकरण करण्यात आलं आहे. लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी महापालिकेच्या जी उत्तर विभागानं अभिनव संकल्पना अमलात आणल्या आहेत. 

या भागात चारचाकी वाहनांवरून ध्वनिक्षेपकांवरून लोकांमध्ये लसीकरणाबाबत व करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जनजागृती केली जात आहे. लक्ष वेधून घेणारी गाणी ऐकवत लोकांना लसीकरणासाठी येण्याबाबत आवाहन केलं जात आहे. त्याचबरोबर या भागात विविध भाषिक लोक राहत असल्यामुळं मराठी, हिंदी, तेलुगू, तमीळ, उर्दू आदी भाषांमधून लेखी आवाहनही केलं जात आहे.

जी उत्तर विभागातील रुग्णांची सद्य:स्थिती

  • ०.६४%   रुग्णवाढीचा दर
  • १०९     दिवस रुग्ण दुपटीचा कालावधी
  • ३६४     प्रतिबंधित मजले
  • १४       प्रतिबंधित इमारती
  • २         प्रतिबंधित विभाग


विभाग
गुरुवारचे रुग्ण
एकूण उपचाराधीन रुग्ण
दादर
४७
४२८
धारावी
५८
२८५
माहिम
७५
५३७



हेही वाचा -

भांडूपच्या मॉलमधील रुग्णालयाला भीषण आग, २ जणांचा मृत्यू

सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा