Advertisement

मुंबईत भारतीय नौदलाच्या INS रणवीर युद्धनौकेत स्फोट

मंगळवारी INS रणवीर या युद्धनौकेच्या अंतर्गत कंम्पार्टमेंटमध्ये स्फोट झाला आहे.

मुंबईत भारतीय नौदलाच्या INS रणवीर युद्धनौकेत स्फोट
SHARES

मुंबईत भारतीय नौदलाच्या डॉकयार्डमध्ये मंगळवारी INS रणवीर या युद्धनौकेच्या अंतर्गत कंम्पार्टमेंटमध्ये स्फोट झाला आहे. या स्फोटात जहाजावर तैनात नौदलाच्या ३ जवानांचा मृत्यू झाला आहे. तर ११ जवान जखमी झाले आहेत.

दरम्यान, स्फोटानंतर आग तात्काळ आटोक्यात आणल्यानंतर जहाजाचे फारसे नुकसान झाले नाही. भारतीय नौदलाच्या अधिकार्‍यांच्या मते, INS रणवीर पूर्व नौदल कमांडकडून क्रॉस कोस्ट ऑपरेशनल तैनातीवर होते आणि लवकरच बेस पोर्टवर परतणार होते. स्फोटाचे कारण समजू शकले नाही. याची चौकशी करण्यासाठी चौकशी मंडळ तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


(सविस्तर वृत्त लवकरच)



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा