Advertisement

मध्य रेल्वे फटका गँगला आळा घालण्यात अपयशीच

फटका गँगला आळा घालण्यात मध्य रेल्वे पोलीस काहीसे अपयशीच ठरत समजतं.

मध्य रेल्वे फटका गँगला आळा घालण्यात अपयशीच
SHARES

रेल्वे प्रवासात अनेकदा प्रवाशांना फटका गँगला सामोरं जावं लागतं. ही फटका गँगला २ स्थानकाच्या मध्यभागी उभी राहून दरवाजात उभे राहणाऱ्या प्रवाशांवर काटी अथवा दगड मारून त्यांच्याकडील वस्तू लंपास करते. त्यामुळं अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागतो तर काही जण गंभीर जखमी होतात. असं असलं तरी मिळालेल्या माहितीनुसार अद्याप या फटका गँगला आळा घालण्यात मध्य रेल्वे पोलीस काहीसे अपयशीच ठरत समजतं. २०१९ पासून ते आतापर्यंत ५९० गुन्हे मध्य रेल्वे मुंबई विभागात घडले असून फक्त ५० गुन्ह्यांचाच यशस्वीरीत्या तपास करण्यात रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे.

लोकसत्ता या वृत्तवाहिनीनं दिलेल्या बातमीनुसार, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात २०१९ मध्ये फटका गँगच्या विरोधात सर्वाधिक ५१३ गुन्हे दाखल असून यातील ४० गुन्ह्यांचा तपास करण्यात लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाला यश आले आहे. तर ५० आरोपींची धरपकड केली. २०२० मध्ये जानेवारी ते मार्चपर्यंत लोकल सुरू असल्या तरी त्यानंतर मेपर्यंत लोकल बंद राहिल्या. जून २०२० पासून पुन्हा अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू झाल्या. कोरोनाकाळात फटका गँगविरोधात पहिला गुन्हा वडाळा लोहमार्ग पोलीस हद्दीत ऑक्टोबरमध्ये दाखल झाला. यामध्ये प्रवाशाचा मोबाइल लंपास करण्यात आला होता. त्यानंतर गुन्हे घडत राहिले.

फेब्रुवारी २०२१मध्ये टिळकनगर आणि मानखुर्द स्थानकाजवळ सलग ३ घटना घडल्या. ज्यात रुळांजवळ बसलेल्या काही अज्ञात व्यक्तींनी धावत्या लोकलमधील दरवाजावळ उभ्या असलेल्या प्रवाशांच्या हातावर फटका मारून रुळावर पडलेल्या वस्तू लंपास केल्या. २०२०मध्ये  ६९ गुन्ह्यांची नोंद झाली. यामध्येही आठ गुन्ह्यांचा यशस्ववीरित्या तपास करण्यात आला. ६९ गुन्ह्यांत १४ जणांना अटक केली.

२०२१ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पहिले साडेतीन महिने लोकल सर्वांसाठी सुरू असली तरी त्यानंतर अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य कोणालाही प्रवासाची परवानगी नाही. त्यामुळे लोकल गाड्यांना गर्दीचे प्रमाण फार कमी आहे. शिवाय फटका गँगच्या वाढत्या गुन्ह्यांमुळं लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाने गस्तही वाढवली. परिणामी या वर्षात फटका गँगचे गुन्हे कमी झाल्याचे निदर्शनास आले. जून महिन्यापर्यंत आठ गुन्हे दाखल आणि २ गुन्ह्यांचा तपासात २ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

रुळाजवळील झोपड्यांमध्ये वास्तव्य असणारे गुन्हेगार व त्यांच्या कुटुंबीयांची माहिती घेतली जात आहे. मध्य रेल्वेवरील वडाळा, कोपरखैरणे, ऐरोली, रबाळे, कल्याण, कोपर, सॅन्डहस्र्ट रोड स्थानक, डोंबिवली, ठाणे, नाहूर, कोपरी ब्रिज यासह अन्य काही ठिकाणी फटका गँग कार्यरत आहेत. फटका गँगच्या २७ जागा हेरण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणी लोहमार्ग पोलीस व रेल्वे सुरक्षा दलाचे मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा