Advertisement

अरबी समुद्रात मान्सूनच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण


अरबी समुद्रात मान्सूनच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण
SHARES

मुंबईत दिवसेंदिवस उकाडा प्रचंड वाढत असल्यानं नागरिक हैराण झाले आहेत. तसंच, लॉकडाऊनमुळं २४ तास घरी राहत असल्यानं अनेकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतो. अशातच, भारतीय हवामान विभागानं गुरुवारी पावसाबाबत आनंदाची बातमी दिली आहे. अरबी समुद्रात मान्सूनच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाल्याने एक जून रोजी मान्सूनचे केरळमध्ये आगमन होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याशिवाय, मुंबईतही पुढील आठवड्यात मान्सूनपूर्व सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव आता अधिक तीव्र होत आहे. अरबी समुद्रामध्ये मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. आग्नेय आणि पूर्व-मध्य अरबी समुद्रामध्ये ३१ मे ते ४ जून दरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळं केरळमध्ये १ जून रोजी मान्सून दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. 

याआधी केरळमध्ये मान्सून ४ दिवस उशीरा दाखल होणार असल्याचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. मात्र, यामध्ये जून महिन्यात सुरू होणाऱ्या पावसावर शेती आणि अर्थचक्र अवलंबून असल्यानं शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांनाही पावसाची प्रतीक्षा आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर मग त्याचा पुढील प्रवास महाराष्ट्रातील आगमनाबद्दल पूर्वानुमान वर्तवण्यात येणार आहे. मुंबईत गुरुवारी ढगाळ वातावरणाची स्थिती निर्माण झाली होती.



हेही वाचा -


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा