Advertisement

अदर पूनावाला यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी, उच्च न्यायालयात याचिका

वकील दत्ता माने यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकेत त्यांनी अदर पूनावाला यांना लस पुरवठ्यावरुन धमकी देणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचीही मागणी केली आहे.

अदर पूनावाला यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी, उच्च न्यायालयात याचिका
SHARES

कोविशिल्ड लसीची निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयाकडं करण्यात आली आहे. वकील दत्ता माने यांनी ही याचिका दाखल केली आहे.  याचिकेत त्यांनी अदर पूनावाला यांना लस पुरवठ्यावरुन धमकी देणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचीही मागणी केली आहे.

मागील महिन्यात अदर पूनावाला यांनी एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलॆ होतं की,  त्यांना देशातील वेगवेगळ्या राज्यांतील मुख्यमंत्र्यांकडून व मोठ्या व्यक्तींकडून धमक्या मिळत आहे. ते आणि त्यांचे कुटुंब सुरक्षित नाही. या पार्श्वभूमीवर दत्ता माने यांनी उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. 

जर लसनिर्मिती करणाऱ्यांना असुरक्षित वाटत असेल तर याचा परिणाम लसनिर्मितीवर होऊ शकतो आणि जर अदर पूनावाला जीवाला धोका असण्याच्या भीतीपोटी भारताबाहेर असतील तर हे वादळात कॅप्टनविना असणाऱ्या जहाजासारखे आहे’, असे दत्ता माने यांनी याचिकेत म्हटलं आहे.

दत्ता माने यांनी याचिकेत आतापर्यंत झालेल्या लसीकरणाची आकडेवारी दिली असून आपण पुणे पोलीस आयुक्त आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे याप्रकरणी तक्रार केली असल्याचं म्हटलं आहे.  देशातील ९८ टक्के लोकांचं लसीकरण होणं बाकी. त्यामुळे आपल्याला लसीची आवश्यकता आहे. सिरमने पूर्ण क्षमतेने काम करण्यासाठी त्यांच्या सीईओचे देशात असणं आवश्यक आहे. अन्यथा लसनिर्मितीचे काम मंदावेल. त्यामुळे पूनावाला व सिरमच्या संपत्तीचे रक्षण करण्यात यावे. 

अदर पूनावाला यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात यावी. सध्या त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात येत आहे, असं याचिकेत म्हटलं आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अदर पूनावाला यांनी ‘द टाईम्स’ या युनायटेड किंग्डममधील वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत भारतातील सध्याच्या स्थितीसाठी कोण जबाबदार आहे यासंदर्भात आपण भाष्य करू शकत नाही, असे म्हटले. यावेळी त्यांनी ‘काही राज्यांचे मुख्यमंत्री आणि उद्योगपतींकडून लसींची मागणी करणारे, धमकावणारे फोन आपल्याला येत असल्याचा खुलासा करतानाच सध्याच्या परिस्थितीला कोणाला जबाबदार ठरवता येईल यासंदर्भात मी कोणाचे नाव घेतले किंवा उत्तर दिले तर माझा शिरच्छेद केला जाईल, अशी भीती व्यक्त केली आहे. 



हेही वाचा

मास्कविना फिरणाऱ्यांकडून ५४ कोटींचा दंड वसूल

मुंबईत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत पुन्हा वाढ

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा