Advertisement

JNU मधील हल्ल्याच्या निषेधार्थ सेलिब्रिटीं मैदानात

या हल्याच्या निषेधार्थ सेलिब्रिटींनी ही रस्त्यावर येत या हल्याला विरोध दर्शवला. या निदर्शनात इतर शेकडो नागरिकांनीही या सेलेब्जना पाठींबा दिला.

JNU मधील हल्ल्याच्या निषेधार्थ सेलिब्रिटीं मैदानात
SHARES

नवी दिल्लीच्या जेएनयू विद्यापिठात झालेल्या हल्याबाबत सर्वत्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. त्यात आता सेलिब्रिटीनी ही उडी घेत या घटनेचा निषेध नोंदवला आहे. चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अनुभव सिन्हा यांच्यासह अनेक चित्रपट सेलेब्ज, मुंबईतील  कार्टर रोड येथे जमले होते. या दरम्यान, अनुभव सिन्हा हातात तिरंगा घेताना दिसले, तर अनुराग कश्यप हातात चे प्लेकार्ड घेऊन हल्ल्याला विरोध दर्शवित होते.

दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) रविवारी रात्री विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आला. ६० हून अधिक गुंड चेहरा झाकून विद्यापीठात आले होते. त्यांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात पंधराहून अधिक विद्यार्थी जखमी झाले होते. या हल्याचे पडसाद देशभरात आता उमटू लागले आहे. या हल्याच्या निषेधार्थ सेलिब्रिटींनी ही रस्त्यावर येत या हल्याला विरोध दर्शवला. या निदर्शनात इतर शेकडो नागरिकांनीही या सेलेब्जना पाठींबा दिला. यावेळी चित्रपट अभिनेत्री रिचा चड्ढा,  दिग्दर्शक अनुभव सिन्हा, विशाल भारद्वाज, सावधन इंडियाचे माजी होस्ट सुशांत सिंग, कुणाल कामरा, अभिनेता राहुल बोस, अभिनेत्री गौहर खान, तापसी पन्नू, दिया मिर्झा, दिग्दर्शक वासन बाला, हंसल मेहता, चित्रपट निर्माते झोया अख्तर आणि गीतकार स्वानंद किरकिरे, स्वरा भास्काराही या प्रोटेस्टमध्ये सामील होते.

हेही वाचाः- जेएनयू हिंसाचार : गेट वेवरील आंदोलकांची आझाद मैदानात रवानगी

जेएनयू कॅम्पसमधील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा जमलेल्या सर्व सेलेब्जनी शांततेत निषेध नोंदवला. जमलेल्या सर्व मंडळींनी शांततेत राष्ट्रगान गायले. आयआयटी कानपूरमध्ये सीएएविरोधात प्रसिद्ध कवी फैज अहमद फैज यांच्या 'हम देखेंगे' या गाण्यावरुन वाद झाला होता, पण हेच गाणे आज बॉलिवूड सेलिब्रिटींपैकी एका व्यक्तीने कार्टर रोडमध्ये सुरू असलेल्या निषेधाच्या वेळी गायले. जेएनयू येथे घडलेल्या गोष्टीच्या निषेधार्थ जे बॉलिवूड सेलिब्रिटी सामील झाले होते, त्यांमध्ये तापसी पन्नू, दिया मिर्झा, अनुराग कश्यप, दिग्दर्शक अनुभव सिन्हा, अभिनेता राहुल बोस, अभिनेत्री गौहर खान, सुप्रसिद्ध स्टॅंड-अप कॉमेडियन कुणाल कामरा, दिग्दर्शक वासन बाला, हंसल मेहता, चित्रपट निर्माते झोया अख्तर आणि गीतकार स्वानंद किरकिरे यांची नावे आहेत. या सेलेब्जव्यतिरिक्त अभिनेत्री रिचा चड्ढा, अली फजल, अभिनेत्री श्वेता त्रिपाठी, दिग्दर्शक नीरज गेहवान, सुधीर मिश्रा, अभिनेते सौरभ शुक्ला, अमैरा दस्तूर, विशाल भारद्वाज, रेखा भारद्वाज, विक्रमादित्य मोटवणे, दिग्दर्शक ओनीर, रीमा कागती, किम यांचा समावेश होता.

 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा