SHARE

मुंबईतील साकीनाका भागात शुक्रवारी सायंकाळी  भीषण आग लागली. साकीनाका परिसरातील असल्फा मेट्रो स्थानकाशेजारी असलेल्या बांबू गल्लीतील थिनरच्या कारखान्याला ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.


शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास मेट्रोच्या असल्फा स्थानकाजवळील बांबू गल्लीत आग लागली. काही वेळात आगीने रौद्ररूप धारण केलं. लांबूनही धुराचे लोट दिसत होते. आग खूप मोठी होती, याची माहिती अग्निशमन दलाला त्वरित देण्यात आली. अग्निशमन दलाची २० हून अधिक वाहने घटनास्थळी दाखल झाली आहेत. आग नक्की कशामुळे लागली याचं कारण समजू शकलेलं नाही. संबंधित विषय
ताज्या बातम्या