Advertisement

२४ तासांनंतरही धुमसतेय जवाहर द्विपवरील आग


२४ तासांनंतरही धुमसतेय जवाहर द्विपवरील आग
SHARES

मुंबईच्या जवळील जवाहर द्विप (बुचर आयलंड) येथील मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मालकीच्या तेल टाक्यांना लागलेली आग २४ तासांनंतरही शमलेली नाही. मुंबई अग्निशमन दलाचे अधिकारी ही आग विझवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करत आहेत. ही आग इतकी मोठी आहे की ८ किमी अंतरावर असलेल्या गेट वे आॅफ इंडियावरूनही या आगीच्या ज्वाळांचे दर्शन होत आहे. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास वीज पडून येथील तेलाच्या टाकीला आग लागली होती. 


आव्हानात्मक परिस्थिती

आग विझवण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट अग्निशमन विभाग आणि मुंबई अग्निशमन विभागाचे कर्मचारी प्रयत्न करत आहेत. आगीचा भडका मोठा असल्याने ही आग विझवण्यासाठी फोम आणि इतर थंड केमिकलचा मारा सुरू असल्याची माहिती मुंबई अग्निशमन विभागाचे प्रमुख पी.एस. रहांगदळे यांनी दिली.


आग पुन्हा भडकली

ज्या तेलाच्या टाकीला ज्वाळांनी घेरले आहे, त्या टाकीच्या १० फूट परिसरात जाण्यास अग्निशमन कर्मचाऱ्यांना यश आले आहे. पण ही आग पुन्हा भडकल्याने आग विझवण्यात अडचण निर्माण झाली. ही आग इतर तेल टाक्यांपर्यंत पोहोचू नये, यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


कच्चे तेल साठवण्याची जागा

बुचर आयलंड येथे टँकरद्वारे कच्चे तेल पोहोचवण्यात येते. त्यानंतर हे तेल पाईपलाईनद्वारे रिफायनरीत पोहोचवले जाते. ही आग लवकर आटोक्यात येणे आवश्यक आहे. कारण पोर्ट ट्रस्ट येथे १.७९ लाख किलो लीटर तेल जमा करते. 

बुचर आयलंडवरील आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी ४ फायर बंब कार्यरत आहेत. जवळच्या सर्व टाक्यांमधील तेल माहुल येथे पाईपद्वारे पोहोचवण्यात आले असून या टाक्या खाली करण्यात आल्या आहेत. शिवाय तेलाने भरलेली जहाजेही बंदरात नांगरून ठेवण्यात आली आहेत.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा