Advertisement

ताडदेव परिसरातील बहुमजली कमला इमारतीला भीषण आग

इमारतीतील नागरिकांना घरातून बाहेर काढण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरू करण्यात आले आहे.

ताडदेव परिसरातील बहुमजली कमला इमारतीला भीषण आग
SHARES

मुंबईतील ताडदेव परिसरात इमारतीला भीषण (Mumbai building fire) आग लागली आहे. ताडदेव परिसरात असलेल्या कमला या इमारतीला ही आग (Kamala Building fire) लागली आहे. 

ही रहिवाशी इमारत असून २० मजली इमारत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. इमारतीच्या १८व्या मजल्यावर ही आग लागली आहे. या आगीत २ जण जखमी झाले आहेत.  त्यांना उपचारासाठी शेजारील भाटीया रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या आणि जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १२ गाड्या दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

ताडदेव परिसरात असलेल्या भाटीया रुग्णालयाच्या जवळील कमला या बहुमजली इमारतीला ही आग लागली आहे. सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास आग लागली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

इमारतीतील नागरिकांना घरातून बाहेर काढण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरू करण्यात आले आहे. इमारतीमध्ये आणखी काही नागरिक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

इमारतीला आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर सुद्धा दाखल झाल्या आहेत.संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा