Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
55,601
3,028
Maharashtra
6,39,075
62,194

लोअर परळमधील रघुवंशी मिलमध्ये भीषण आग

मुंबईत आणखी एक आगीची घटना घडली आहे. लोअर परेलमधील रघुवंशी मिलमध्ये मोठी आग लागली आहे.

लोअर परळमधील रघुवंशी मिलमध्ये भीषण आग
SHARES

मुंबईत आणखी एक आगीची घटना घडली आहे. लोअर परेलमधील रघुवंशी मिलमध्ये मोठी आग लागली आहे.  आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. लेव्हल ३ ची ही आग असूून विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

 रघुवंशी मिलमधील पी टू या इमारतीला भीषण आग लागली आहे. इमारतीचा पहिला मजल्यावर आग वेगाने पसरली.  खाजगी कार्यालय बंद असल्याने सुदैवाने कुणीही यात जखमी झालेलं नाही. जवळच्या इमारतीमध्ये काही कार्यालयात काम करत असलेल्या सर्वांना बाहेर काढण्यात आलं आहे.

गुरूवारी मुंबईत आग लागण्याची ही तिसरी घटना आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास नरीमन पॉइंट येथील जॉली मेकर इमारतीतील बँक ऑफ बहरेन आणि कुवैतच्या शाखेत भीषण आग लागली. अंधेरीच्या मरोळ भागातील नंद-धाम औद्योगिक वसाहतीमध्ये  गुरूवारी  १२. ५० वाजताच्या सुमारास आग लागली. यात कोणतीही जीवीतहानी झाली नाही. आग विझवताना बेशुद्ध झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हेही वाचा -

मुंबईत 'या' बँकेच्या कार्यालयात मोठी आग
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा