Advertisement

डोंबिवली MIDC तील कंपनीला भीषण आग

डोंबिवली पूर्वेतील खंबालपाडा परिसरात असलेल्या शक्ती प्रोसेस कपडा कंपनीला भीषण आग लागली आहे

डोंबिवली MIDC तील कंपनीला भीषण आग
SHARES

डोंबिवली पूर्वेतील खंबालपाडा परिसरात असलेल्या शक्ती प्रोसेस कपडा कंपनीला संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास भीषण आग लागली. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्या.

पण आगीची भीषणता पाहता अग्निशमन दलाच्या नऊ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मात्र, आग विजवत असताना अग्निशमन दलाचे कर्मचारी सुभाष भोर हे किरकोळ जखमी झाले आहेत. या आगीत जवळपास सहा कोटी रुपयांचा कपड्यांचा माल जळून खाक झाला आहे.

काही दिवसांपूर्वी सोनारपाडा परिसरात एका गोदामाला आग लागली होती. डोंबिवलीत सातत्यानं आगीच्या घटना घडत आहेत. या घटनांच्या पार्श्वभूमीवर बेकायदा भंगार गोदाम आणि केमिकल कंपन्यांवर कारवाईची मागणी होत आहे. मात्र, प्रशासनाकडून काही ठोस कारवाई होताना दिसत नाही.



हेही वाचा

सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडच्या विस्तारासाठी २ वर्षांचा विलंब

मुंबईत भीषण अपघात, मर्सिडिसच्या धडकेत डिलेवरी बॉयचा मृत्यू

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा