Advertisement

मुंबईत भीषण अपघात, मर्सिडिसच्या धडकेत डिलिव्हरी बॉयचा मृत्यू


मुंबईत भीषण अपघात, मर्सिडिसच्या धडकेत डिलिव्हरी बॉयचा मृत्यू
File Image
SHARES

मुंबईच्या ओशिवरा परिसरात एका मर्सिडिसच्या धडकेत एका डिलेवरी बाँयचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. या प्रकरणीओशिवरा पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी चालकाला अटक केली आहे.

 ओशिवरा परिसरात कार रेसिंगच्या नादात एका मर्सिडिस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटलेल्या कारने डिवायडर ओलांडून  रस्त्यावरून फूड डिलेव्हरी करण्यासाठी जाणाऱ्या 19 वर्षीय दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, या धडकेत दुचाकी चालक काही अंतरावर जाऊन पडला. अपघातानंतर त्या मुलाला जवळच्या शासकिय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. या मर्सिडिजमध्ये 3 ते 4 जण असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुढल्या महिन्यातच मृत मुलाचा 20 वाढदिवस होता. अपघातानंतर समोर आलेल्या दृश्यांमध्ये मर्सिडीज कार आणि दुचाकी चक्काचूर झाली आहे.

हेही वाचाः- प्रसिद्ध होमिओपॅथिक डॉ. प्रफुल्ल विजयकर यांचं निधन

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ओशिवरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी कार ताब्यात घेतली असून चालकाला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा