Advertisement

मुंबई सेंट्रलमधील इमारतीला आग


मुंबई सेंट्रलमधील इमारतीला आग
SHARES

मुंबई सेंट्रल परिसरात शुक्रवार दुपारी बेलासीस रोडवरील जीया अपार्टमेंट नावाच्या ६ मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग इमारतीच्या तळमजल्यावरील गोदामाला लागली. अग्निशमन दलाने इमारतीतील सर्वांना सुरक्षीतरित्या बाहेर काढलं आहे.



ही आग दुपारी १२. २९ वाजता लागल्याचं समजत आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन विभागाचे १३ फायर इंजिन घटनास्थळी दाखल झाले आहेत.



या आगीमध्ये अद्याप कुणीही जखमी झाल्याची माहिती मिळालेली नाही. ही इमारत अंजुमन गर्ल्स हायस्कूलजवळ असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शाळेतील सर्व विद्यार्थिनींना बाहेर काढण्यात आलं आहे. आगीचं कारण समजलं नसलं, तरी आग नियंत्रणात असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा