फायर ब्रिगेडच्या जवानानेे वाचवले मांजरीचे प्राण

कुर्ला - फायर ब्रिगेडच्या जवानांनी आपल्या जिवावर खेळून एका मांजरीचे प्राण वाचवले आहेत. सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास एक मांजर कुर्ल्यातल्या शमीम टॉवरच्या तिसऱ्या मजल्यावर अडकली होती.

ही मांजर तिथे अडकल्याचं पाहून तिथल्या उपस्थित नागरिकांनी अग्निशमन दलाला याची माहिती दिली. त्यानंतर तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला मांजरीचे प्राण वाचण्यात यश आलं. मांजरीच्या बचावाचा हा थरार उपस्थितांच्या अंगावर काटा आणणारा ठरला.

Loading Comments