Advertisement

ठाण्यातील आर्केडिया मॉलमध्ये भीषण आग, आगीमुळे परिसरात धुराचे लोट

अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ठाण्यातील आर्केडिया मॉलमध्ये भीषण आग, आगीमुळे परिसरात धुराचे लोट
SHARES

ठाण्यातील आर्केडिया मॉलमध्ये आज सकाळी ८ च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीचा धूर ठाणे पश्चिम येथील हिरानंदानी इस्टेट परिसरात पसरला होता. आग लागल्याचे वृत्त समजताच तात्काळ अग्निशमन दल, रिजनल डीझास्टर मेंएजमेंट सेंटर यांच्यासोबत फायर इंजिन टॅंकर्स व quick response vehicle दाखल झाले आहेत. सुदैवाने या घटनेमध्ये कोणत्याही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र सध्या आग नियंत्रणामध्ये आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

दोन दिवसांपूर्वीच ठाण्यात रेमांडच्या कार्यालयामध्ये आग लागली होती. पहाटेच्या वेळेस लागलेल्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले होते. या घटनेतही कोणतीही जीवितहानी झालेली नव्हती. दरम्यान ठाण्यात ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे वृत्त त्यावेळेस देण्यात आले होते.
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा