Advertisement

चर्चगेट रेल्वेस्थानक इमारतीजवळ आग

ही आग इमारतीच्या गेट क्रमांक ३ जवळ असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला लागली आहे.

चर्चगेट रेल्वेस्थानक इमारतीजवळ आग
SHARES

पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट रेल्वे स्थानक इमारतीजवळ आग लागली. गुरूवारी दुपारच्या सुमारास ही आग लागली होती. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक नागरिक, पोलीस व आग्निशमन दलाचे जवान दाखल झाले.

ही आग इमारतीच्या गेट क्रमांक ३ जवळ असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला लागली आहे. गुरूवारी दुपारी १.४५ वाजताच्या सुमारास लागल्याचं समजतं. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

अग्निशमन दलाच्या जवानांनी अर्ध्या तासातच ही आग विझवली. यात कोणीही जखमी झालेले नसल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने दिली आहे. दरम्यान ही आग शॉर्ट सर्किटमुळं लागल्याची माहिती समोर येत आहे. 

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा