Advertisement

पवईमध्ये इमारतीच्या बेसमेंटमध्ये आग

दुपारी १२ च्या सुमारास ही आग लागल्याची माहिती अग्निशमन विभागाला मिळाल्यानंतर तातडीने अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन विभागाच्या ८ गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. लेव्हल ३ ची ही आग असून अग्निशमन विभागाचे जवान आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

पवईमध्ये इमारतीच्या बेसमेंटमध्ये आग
SHARES

मुंबईतल्या पवई परिसरात एका इमारतीच्या बेसमेंटमध्ये आग भडकल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पवईच्या साकी विहार रोडवरच्या नेट मॅजिक सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड इमारतीच्या बेसमेंटमध्ये ही आग आगल्याची माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली आहे.

दुपारी १२ च्या सुमारास ही आग लागल्याची माहिती अग्निशमन विभागाला मिळाल्यानंतर तातडीने अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन विभागाच्या ८ गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. लेव्हल ३ ची ही आग असून अग्निशमन विभागाचे जवान आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

या इमारतीपासून थोड्याच अंतरावर बालाजी स्टुडिओ आहे. इमारतीच्या बेसमेंटमध्ये मोठ्या प्रमाणावर वायर्सचा साठा होता. याच वायर्सच्या साठ्याला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. रविवार असल्यामुळे सुट्टीच्या दिवशी या इमारतीमध्ये वर्दळ कमी होती. त्यामुळे मोठी दुर्घटना जरी टळली असली, तरी अनेक कामगार या आगीत अडकले होते. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून किरकोळ जखमींवर राजावाडी रूग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, अजूनही आग आटोक्यात आली नसून इमारतीच्या बेसमेंटमध्ये मोठ्या प्रमाणावर धूर साठला आहे. या धुरामुळे आसपासच्या परिसरातील नागरिकांनाही त्रास होत असल्याची माहिती आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा