मुलुंड- मुलुंड पूर्वमधील अरुणोदय नगर परिसरात मासे विक्रेते अनधिकृत रित्या मासे विक्री करत आहेत. हे मासे विक्रेते परप्रांतीय असून ते जागा मिळेल तिथे बसून मासे विकतात. त्यामुळे ते अस्वच्छ पाणी रस्त्यावरच पडून राहते. यामुळे परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी पर्यायाने त्या भोवती घोगावणाऱ्या माश्या यांचे प्रमाण वाढले आहे.अशा अनधिकृत विक्रेत्यांमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या सगळ्या प्रकारामुळे स्थानिक त्रस्त आहेत. तेथील स्थानिक विशाल वर्तक यांनी टी वॉर्ड मध्ये या संदर्भात तक्रार केली, परंतु कोणतीही कारवाई अद्याप करण्यात आलेली नाही.