वरळीच्या शासकीय वसतीगृहातील ध्वजारोहण सोहळा

 BDD Chawl
वरळीच्या शासकीय वसतीगृहातील ध्वजारोहण सोहळा
वरळीच्या शासकीय वसतीगृहातील ध्वजारोहण सोहळा
वरळीच्या शासकीय वसतीगृहातील ध्वजारोहण सोहळा
See all

वरळी - वरळीच्या शासकीय वसतिगृहात सकाळी 8 वाजता ध्वजारोहण सोहळा पार पडला. समाज कल्याण विभागीय आयुक्त ममता शेरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यकमाला वसतिगृहाच्या गृहप्रमुख संगीता डावखरे, संत मीराबाई वसतिगृहाचे ग्रहपाल प्रमिला आम्ले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाचे गृहपाल श्रीकांत करकरे, वसतिगृह निरीक्षक आणि वरळी येथील तीनही वसतिगृहाचे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमात वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषण करुन कार्यक्रमाची शोभा वाढवली.

Loading Comments