Advertisement

'बी' विभागात अवतरले गांधीजी!


SHARES

भायखळा - पालिकेचे सिंघम म्हणून ओळख असलेले उदयकुमार शिरूरकर यांनी बी विभागामध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाची आखणी शिरूरकर 2 आठवड्यांपासून करत होते. विशेष म्हणजे यावेळी महात्मा गांधीजींच्या वेशात आलेल्या पोपटलाल कनेरियांनी गांधीजींची आठवण करून दिली.

यावेळी महिलांनी देशभक्तीपर गीते सादर करत वातावरण देशभक्तीमय केलं. या कार्यक्रमाला कॉमेडी एक्स्प्रेस फेम अरूण कदम यांच्यासह अनेक पालिकेचे अधिकारी तसेच स्थानिक उपस्थित होते. अरूण कदम,गांधीजांच्या वेशात आलेले कनेरिया यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी झेन लाईव्ह मीडियाचे संचालक मिलिंद सबनीस यांनी देखील उपस्थिती लावली होती.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा