Advertisement

कडाक्याच्या थंडीत मायेची उब !


कडाक्याच्या थंडीत मायेची उब !
SHARES

मुलुंड - महाराष्ट्रात थंडीची लाट पसरली आहे. उच्च वर्गीय हिटर, रजई यांचा वापर करून थंडीचा सामना करतात. परंतु याच सोयी आदिवासी पाड्यातील गरिबांना कोण पुरवणार? याच संकल्पनेला अनुसरून रोटरी क्लब ऑफ मुलुंड हिल व्ह्यू या संस्थेने मुलुंड पश्चिमेकडील खिंडीपाड्यात एक उपक्रम हाती घेतला. मंगळवारी रोटरी क्लबच्या वतीने खिंडीपाडा आणि बालराजेश्वर मंदिर परिसरात गरिबांना ब्लँकेट आणि थंडीत शरीरासाठी पौष्टिक ठरणारा सुका मेवा मोफत वाटण्यात आला. खिंडीपाडा हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागूनच असल्यामुळे हा परिसर तसा डोंगराळच आहे. आणि म्हणूनच इथे थंडीचे प्रमाण थोडे जास्त असते. त्यामुळेच या भागात हा उपक्रम राबवण्यात आला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा