Advertisement

वाढत्या खर्चामुळं कॅब चालकांवर उपासमारीची वेळ


वाढत्या खर्चामुळं कॅब चालकांवर उपासमारीची वेळ
SHARES

कोरोनामुळं राज्यात लॉकडाऊन करण्यात आलं असून, या लॉकडाऊनमुळं अॅपच्या आधारे आरक्षित होणाऱ्या कॅब चालकांची आर्थिक स्थिती बिकट झाली. तसंच, नवी कामं शोधण्याची वेळ या चालकांवर आली आहे. या चालकांना कारसाठी घेतलेले कर्ज कसं फेडणार याची चिंता लागली आहे. अनेकांनी उत्पन्न चांगले येत असल्याने कर्ज काढून ही कार घेतली, पण आता कार आपल्याजवळ ठेवणंही अवघड झालं आहे.

या कार चालकांच्या कहाणी धक्कादायक आहेत. अनेक कार चालक अनलॉकमधील कठोर नियम, कमी होत जाणारी मागणी, सातत्यानं कार निर्जंतुक करण्यासाठी होणारा खर्च तसंच, इंधनाच्या वाढत्या भावानं प्रश्न जास्तच बिकट होत आहे. उबेरनं केलेली कपात, तसेच बंद केलेलं मुंबई कार्यालय याचेच द्योतक असल्याचं सांगितलं जात आहे.

काही आर्थिक अभ्यासक अॅप आधारीत कार चालकांना उद्योजक मानलं तर त्यांचे प्रश्न सुटण्यास काही प्रमाणात नक्कीच मदत होऊ शकणार आहे. कोरोनामुळं अनेकांच्या व्यवसायावर गदा आली असून, अनेकांच्या निर्जंतुकीरण करण्याचा खर्च परवडत नाही. 


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा