Advertisement

'त्या' लकी कॅाईनमुळे वाचला जीव , दिवार सिनेमासारखी घडली घटना - एजाज लकडावाला

एजाज राजनसाठी अधूनमधून काम करायचा. याचाच राग ‘डी कंपनी’ला होता.

'त्या' लकी कॅाईनमुळे वाचला जीव , दिवार सिनेमासारखी घडली घटना - एजाज लकडावाला
SHARES

दिवार चित्रपटात ज्या पद्धतीने ‘बिला नं ७८६’ अमिताभसाठी ‘लकी’ ठरला. त्याच प्रमाणे माझा लकी काँईन माझासाठी लकी ठरल्याची कबूली  कुख्यात गुंड एजाज लकडावालाने पोलिसांना दिली आहे.  छोटा राजनसोबत गेल्याने छोटा शकिलच्या हस्तकांनी त्याच्यावर सात गोळ्या झाडल्या त्यावेळी त्याच्या लकी  काँईनने जिव वाचवल्याची महिती लकडावालाने पोलिसांना दिलीआहे.


१९९३ च्या स्फोटानंतर छोटा राजन आणि दाऊद यांच्यात वैमनस्य आले. त्यावेळी एजाज राजनसोबत वेगळा झाला होता. मात्र डी कंपनीकडून वाढता धोका पाहता त्याने राजनच्या परवानगीनेच स्वत:ची वेगळी टोळी बनवली. मात्र तरीही एजाज राजनसाठी अधूनमधून काम करायचा. याचाच राग ‘डी कंपनी’ला होता. बँकाँकमध्ये लकडावाला असताना शकिलच्या हस्तकांनी त्याच्यावर गोळीबार केला. त्यावेळी सात गोळ्या त्याच्यावर झाडण्यात आल्या, मात्र “एका लकी काँईनमुळे मी वाचलो” असे लकडावालाने पोलिसांना सांगितले.

हेही वाचाः -अजमेर बॉम्ब स्फोटातील आरोपी डॉ. जलीस अन्सारी मुंबईतून फरार

जोगेश्वरीच्या अमृतनगरमध्ये राहणाऱ्या एजाजवर तो अल्पवयीन असतानाच पहिला गुन्हा नोंदवण्यात आला होता. शाळेत असताना त्याने त्याच्या शिक्षिकेला मारहाण केली होती. त्यानंतर एजाज परिसरात छोट्या - मोठ्या चोरी आणि मारामाऱ्या करू लागला. त्यावेळीच 'डी गँग'ची नजर त्याच्यावर पडली. पुढे राजनच्या सांगण्यावरून तो सुपाऱ्या घेऊ लागला. पायधुनी पोलिस ठाण्यात एजाजवर २ हत्येच्या गुन्ह्यांची नोंद आहे. याच गुन्ह्यात तो अटकेत असताना १९९७ मध्ये त्याला नाशिक जेलमध्ये ठेवण्यात आले होते. वैद्यकीय तपासणीसाठी त्याला मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात आणले असताना पोलिसांना हुलकावणी देऊन त्याने पळ काढला होता. अखेर २३ वर्षानंतर मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधीपथकाने लकडावालाला बिहारमधून अटक केली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा