Advertisement

महापालिकेला साडेचार लाखात पडलं कचरा विल्हेवाटीचं आवाहन!

स्वच्छ भारत अभियानाचे राष्ट्रीय अँबेसेडर अमिताभ बच्चन यांच्यावतीने करण्यात आलेल्या आवाहनाच्या लघुचित्रफीतीसाठी हा साडेचार लाखांचा खर्च करण्यात आला आहे.

महापालिकेला साडेचार लाखात पडलं कचरा विल्हेवाटीचं आवाहन!
SHARES

मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्यामार्फत कचरा वर्गीकरण व प्रक्रिया तंत्राच्या माहितीसाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेवरच महापालिकेने तब्बल साडेचार लाखांचा खर्च केला आहे. स्वच्छ भारत अभियानाचे राष्ट्रीय अँबेसेडर अमिताभ बच्चन यांच्यावतीने करण्यात आलेल्या आवाहनाच्या लघुचित्रफीतीसाठी हा साडेचार लाखांचा खर्च करण्यात आला आहे.



कचरा व्यवस्थापनावर होती कार्यशाळा

मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्यामार्फत १ ते ३ सप्टेंबर या कालावधीत वरळीत कचरा वर्गीकरणासंदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कचऱ्याचे वर्गीकरण, प्रक्रियातंत्र व साधनसामग्रीची माहिती मुंबईतील विविध गृहनिर्माण संस्था, व्यापारी संकुल, हॉटेल्स यांना देण्यासाठी हे भव्य प्रदर्शन भरवण्यात आले होते.


मुख्यमंत्र्यांसह अमिताभ बच्चनही उपस्थित

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते उद्घाटन झालेल्या या कार्यक्रमात चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन उपस्थित होते. यावेळी या प्रदर्शनासाठी उपस्थित राहण्यासंदर्भात आवाहन करण्यासाठी स्थानिक वृत्तपत्रातील जाहिराती, तसेच दूरदर्शन वाहिन्या, रेडिओ व सिनेमागृहात प्रदर्शित करण्यासाठी लघुचित्रफीत तयार करण्यात आली. त्यामुळे या कार्यशाळेला प्रसिद्धी देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या चित्रफितीवरच हा साडेचार लाखांचा खर्च करण्यात आला.



हेही वाचा

पालिकेच्या जागेत कचरा प्रकल्प राबण्यास सोसायट्यांना परवानगी


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा