कचरा वर्गीकरणाचा प्रकल्प असेल तर बांधकामास परवानगी

  Pali Hill
  कचरा वर्गीकरणाचा प्रकल्प असेल तर बांधकामास परवानगी
  मुंबई  -  

  मुंबई - नव्या बांधकामाच्या ज्या प्रस्तावात ओला आणि सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्याचा प्रकल्प असेल त्यालाच मंजुरी मुंबई महानगर पालिकेकडून देण्यात येणार आहे. यासंबंधीच्या धोरणाला सोमवारी सुधार समितीच्या बैठकीत मंजूरी देण्यात आलीय. कचऱ्याच्या वर्गीकरणाबरोबरच ओल्या-सुक्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची तरतूद प्रकल्पात करणे बिल्डरांना या धोरणानुसार बंधनकारक असणार आहे. पालिकेच्या या निर्णयाचं बिल्डर आणि बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी स्वागत केलंय. ही काळाची गरज असल्याचं म्हणत पालिकेनं योग्य आणि कडक अंमलबाजवणी करावी, असं मत महाराष्ट्र सोसायटीज वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष रमेश प्रभू यांनी व्यक्त केलंय. तर नव्या बांधकामासह प्रत्येक गृहनिर्माण संस्थांसाठीही हा प्रकल्प बंधनकारक करण्याची गरज प्रभू यांनी व्यक्त केलीय.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.