Advertisement

गॅस सिलिंडरच्या दरात कपात

मुंबईत आता विनाअनुदानित गॅस सिलिंडर ७७६ रुपयांना मिळेल

गॅस सिलिंडरच्या दरात कपात
SHARES

देशभरातल्या गृहिणींना दिलासा मिळाला असून घरगुती सिलेंडरमध्ये ५२ रुपयांनी कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे सर्व सामान्यांच्या खिशाला बसणारी झळ आता काही प्रमाणात कमी होणार आहे. १ मार्चपासून विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. मुंबईत आता विनाअनुदानित गॅस सिलिंडर ७७६ रुपयांना मिळेल. दिल्लीत हाच भाव ८0५ रुपये आहे.

गेल्या वर्षीच्या ऑगस्टनंतर प्रथमच दरकपात करण्यात आली आहे. घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीत गेल्या सहा महिन्यांत सहावेळा दरवाढ करण्यात आली होती. पण, त्यानंतर प्रथमच ही दरकपात करण्यात आली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या माहितीनुसार रविवारपासून नवीन दर लागू झाले आहेत. त्यानुसार दिल्लीत ५३ रुपयांची दरकपात झाली आहे. तर मुंबईतही एवढीच कपात करण्यात आली आहे.

फेब्रुवारी महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढलेल्या किंमतीमुळे गॅसच्या दरात वाढ करण्यात आली होती. दर कमी झाल्यामुळे व्यावसायिकांना सिलेंडर केवळ १४६५.५० रुपयांना मिळणार आहे. तसेच ५ किलोग्रॅमचा छोटा सिलेंडर १८.५० रुपयांना मिळणार आहे. सिलेंडरच्या वाढलेल्या दरावरून विरोधकांनी केंद्र सरकारला काही दिवसांपूर्वी धारेवर धरत, देशभर आंदोलन केली होती. या आंदोलनात काॅग्रेसकडून रिकामे सिलेंडर घेऊन भाजप हटावर देश बजाव असे नारेबाजी केली होती. 

 चार महानगरांमध्ये विना अनुदानित गॅस सिलिंडरचे दर

इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत अनुदानाशिवाय १४.२ किलो एलपीजी सिलिंडरची किंमत ८०५.५० रुपये आहे. त्याचबरोबर विना अनुदानित गॅस सिलिंडरची किंमत कोलकातामध्ये ८३०.५० रुपये, मुंबईत ७७६.५०आणि चेन्नईमध्ये ८२६ रुपये आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा