घाटकोपरमध्ये रहिवाशांचा पालिकेवर घागर मोर्चा

  Ghatkopar
  घाटकोपरमध्ये रहिवाशांचा पालिकेवर घागर मोर्चा
  मुंबई  -  

  उन्हाळा संपलाय आणि जून महिना सुरू झाला असला तरी घाटकोपरच्या असल्फा विभागातील सुंदरनगर, सानेगुरुजीनगर, मुकुंदराव आंबेडकरनगर, हनुमान टेकडी या परिसरात गेल्या 3 महिन्यांपासून कमी दाबामुळे नळाला कधी पाणी येते तर, कधी येतच नाही. त्यामुळे राहिवाशांंना पाण्यावाचून राहावे लागत आहे.


  हे देखील वाचा - वळणाई वसाहतीत दूषित पाणीपुरवठा


  रहिवाशांनी अनेकदा याबाबत स्थानिक नगरसेवक किरण लांडगे यांच्याकडे तक्रार केली. त्यांनीही याबाबत पालिकेच्या जल विभागाकडे तक्रार केली. पण यावर काहीच तोडगा निघू न शकल्याने अखेर बुधवारी वॉर्ड क्रमांक 160 चे नगरसेवक किरण लांडगे यांनी या विभागातील महिलांना घेऊन पालिकेच्या घाटकोपर येथील जलविभागाच्या कार्यालयावर घागर मोर्चा काढला. महिलांनी या विभागाच्या कार्यालयासमोर मातीच्या घागरी फोडल्या. अधिकाऱ्यांना निवेदन देऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याची मागणी केली आहे. शिवाय येत्या महिन्याभरात हा प्रश्न न सुटल्यास याहून उग्र आंदोलन करण्याचा इशारा लांडगे यांनी दिला आहे.


  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
  मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.