Advertisement

जागतिक हवाई मालवाहतुकीमध्ये मे महिन्यात 'इतकी' घट


जागतिक हवाई मालवाहतुकीमध्ये मे महिन्यात 'इतकी' घट
SHARES

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. भारतासह जगभरात कोरोनानं थैमान घातला आहे. त्यामुळं जागतिक पातळीवर अनेक देशांमध्ये लॉकडाऊन व हवाई वाहतुकीवर निर्बंध लादण्यात आले. हवाई मालवाहतुकीला परवानगी देण्यात आलेली असली तरी जागतिक पातळीवरील अनेक व्यवहार,  उद्योग बंद असल्याचा फटका हवाई मालवाहतुकीला मोठ्या प्रमाणात बसला आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या मे महिन्यात कार्गो टन किलोमिटर्स (सीटीके) मध्ये तब्बल २०.३ टक्के घट नोंदवण्यात आली आहे. त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे, एप्रिलच्या तुलनेत हवाई मालवाहतुकीमध्ये काहीशी वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यात ही घट गतवर्षीच्या एप्रिल महिन्याच्या तुलनेत २५.६ टक्के इतकी होती. जगात काही ठिकाणी उद्योगधंदे व व्यवसाय काही प्रमाणात सुरु झाल्यानं आयात, निर्यातीला प्रारंभ झाला आहे. त्यामुळं हवाई मालवाहतुकीला थोडीशी मागणी येऊ लागली आहे.

जागतिक हवाई मालवाहतुकीमधील घट होण्याचं सातत्य सुरु असून काही प्रमाणात ही घट कमी होऊ लागली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय सामग्रीच्या आयात निर्यातीचं प्रमाण हवाई मालवाहतुकीमध्ये लक्षणीय आहे. आता इतर उद्योग सुरु होऊ लागल्यानं आयात व निर्यातीचं प्रमाण वाढु लागलं आहे.  मात्र, कोरोनामुळं मधील काळात कामकाज पूर्णत: ठप्प झाल्याने त्याचा या क्षेत्राला बसलेला आर्थिक फटका अत्यंत मोठा असल्यानं हा फरक भरुन निघण्यास मोठा कालावधी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



हेही वाचा -

मुसळधार पावसामुळे मुंबईतील 'हे' रस्ते बंद

पीपीई कीटमध्येच डॉक्टर तरुणी थिरकली ‘हाय गर्मी’वर, पहा हा भन्नाट डान्स



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा