Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
55,601
3,028
Maharashtra
6,39,075
62,194

कांदिवलीत उभारणार बॉलिवूड थीम पार्क

कांदिवली येथे बॉलिवूड थीम पार्क उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या प्रकल्पासाठी 1900 कोटी रुपये खर्च करणार आहे. या थीम पार्कमधील भव्य स्टुडिओ व्यतिरिक्त, चित्रपट संग्रहालय, एम्फी थियेटर, स्विमिंग पूल यांसारख्या अनेक सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात येतील.

कांदिवलीत उभारणार बॉलिवूड थीम पार्क
SHARES

मुंबईतील कांदिवली येथे बॉलिवूड थीम पार्क उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या प्रकल्पासाठी 1900 कोटी रुपये खर्च करणार आहे. या थीम पार्कमधील भव्य स्टुडिओ व्यतिरिक्त, चित्रपट संग्रहालय, एम्फी थियेटर, स्विमिंग पूल यांसारख्या अनेक सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात येतील. कोट्यवधी रुपयांच्या गुंतवणुकीसोबतच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे.


1900 कोटींची गुंतवणूक

राज्याचे पर्यटन सचिव विजयकुमार म्हणाले, मुंबईतील कांदिवली येथील महिंद्र अँड महिंद्र कंपनीच्या मालकीच्या 21 एकर जागेत हे बॉलिवूड थीम पार्क उभारण्यात येईल. या ठिकाणी स्विमिंग पूल, भव्य स्टुडिओ, फिल्म स्कूल, फिल्म म्युझियम, अ‍ॅम्फी थिएटर उभारले जाईल. सुमारे 1900 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार्‍या या प्रकल्पातून 900 लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.


जीएसटीतून सूट

या माध्यमातून सुमारे एक हजारांहून अधिक लोकांना रोजगार उपलब्ध होईल, असा दावा विजयकुमार यांनी केला आहे. हे प्रकल्प उभारणार्‍या कंपन्यांना जीएसटीतून सूट तसेच अन्य काही सवलती देण्याविषयी सरकारचा विचार सुरू असल्याचेही विजयकुमार यांनी सांगितले.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा