SHARE

कामगार विभागाच्या अखत्यारीत असलेल्या कार्यालयात जर यापुढे महिलांकरता स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था नसल्यास त्या आस्थापनांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येईल. होय अशी सूचनाच कामगार विभागाच्या सर्व कार्यालयांना देण्यात आल्या आहेत.

महिला धोरण, २०१४ ची अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने कामगार विभागाच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालये, कारखाने आणि आस्थापना येथे महिलांकरता स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


स्वतंत्र स्वच्छतागृहे असणे बंधनकारक

कारखाने अधिनियम, १९४८च्या कलम १९ मध्ये देखील महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे असणे बंधनकारक आहे. तसेच महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना (नोकरीचे आणि सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ मध्ये देखील महिलांकरता स्वतंत्र स्वच्छतागृहे असण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे.

या दोन्ही अधिनियमातील तरतुदींची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याच्या सूचना कामगार विभागाच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालयांना देण्यात आल्या आहेत. सदर तरतुदींची अंमलबजावणी न करणाऱ्या कार्यालयांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या