Advertisement

मुलुंडमध्ये विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबीर


मुलुंडमध्ये विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबीर
SHARES

मुलुंड - दहावीच्या परीक्षा तोंडावर आल्या आहेत. पालक आणि विद्यार्थी यांची चांगलीच लगबग सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी दत्तात्रय अॅलेक्स येथे 'मिताई फाउंडेशन' तर्फे पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी उरलेल्या दोन महिन्यात कशाप्रकारे अभ्यास करावा याचं सोप्या शब्दात मार्गदर्शन करण्यात आलं. विष्णू धुरी यांचं या वेळी मुलांना मार्गदर्शन लाभलं. या मार्गदर्शन शिबिराचा विद्यार्थ्यांना फायदा होईल यात शंकाच नाही. पण, आताच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांचा खरोखरच मानसिक ताण देऊ नये, या पार्श्वभूमीवर हे शिबीर राबवणं गरजेचं असल्याचं ही त्यांनी म्हटलं.

संबंधित विषय