मानखुर्दमधील गटाराची दुरवस्था

 Mandala
मानखुर्दमधील गटाराची दुरवस्था
मानखुर्दमधील गटाराची दुरवस्था
मानखुर्दमधील गटाराची दुरवस्था
See all

मानखुर्द - कचरा आणि माती नाल्यात साचल्याने मानखुर्दच्या इंदिरानगर परिसरातील नागरिकांना रोज अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे आरोग्य धोक्यात आल्याची प्रतिक्रिया तिथल्या रहिवाशांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात स्थानिक नगरसेवक शांताराम पाटील यांच्याशी संपर्क साधला असता मनपा अधिकाऱ्यांना सांगितले असून लवकरच समस्येचं निवारण होईल अशी माहिती त्यांनी दिली. तर अनेकदा नगरसेवकांकडे समस्या मांडली असतानाही अजूनही त्याची दखल घेण्यात आली नसल्याचं इथले रहिवासी इकबाल खान यांनी सांगितलं.

Loading Comments