Advertisement

हापूस आंब्याची आवक वाढणार, सामान्यांनाही परवडणार

मुंबईसह राज्यभरातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. फळांचा राजा आंबा आता सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात उपलब्ध होणार आहे.

हापूस आंब्याची आवक वाढणार, सामान्यांनाही परवडणार
SHARES

मुंबईसह राज्यभरातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. फळांचा राजा आंबा आता सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात उपलब्ध होणार आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रोज सरासरी १४ हजार पेट्यांची आवक होत आहे. होलसेल मार्केटमध्ये ३०० ते १२०० रुपये डझन व किरकोळ मार्केटमध्ये ६०० ते २ हजार रुपये डझन दराने आंबा विकला जात आहे.

एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात आवक वाढणार असून, बाजारभावही सर्वसामान्यांच्या आवाक्यात येण्याची शक्यता आहे. २० एप्रिलपासून आवक वाढण्याची शक्यता आहे. एप्रिल व मेमध्ये रोज ५० हजार पेट्यांपेक्षा जास्त आवक होण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. हापूसची निर्यातही सुरू झाली आहे.

आखाती व इतर देशांमध्ये हापूसला मोठी मागणी आहे. यावर्षी हंगाम चांगला होईल, असा अंदाजही व्यक्त केला जात आहे. रायगड, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत हापूसची आवक होत आहे. बुधवारी ३७७ टन हापूस विक्रीसाठी आला. ५ ते ७ डझनच्या पेटीला २ ते ५ हजार रुपये भाव मिळत आहे. यावर्षी काेकणात हापूसचे उत्पादन चांगले असून, बाजार समितीमध्ये नियमित आवक सुरू झाली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा