Advertisement

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर फेरीवाल्यांचे धाबे दणाणले! दादर ब्रिज झाला मोकळा


राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर फेरीवाल्यांचे धाबे दणाणले! दादर ब्रिज झाला मोकळा
SHARES

'मुंबईतील सर्व रेल्वे स्टेशनाबाहेरील फेरीवाल्यांना पुढच्या १५ दिवसांत हटवा, नाहीतर १६ व्या दिवशी मनसे मैदानात उतरून या सगळ्या फेरीवाल्यांना आपल्या पद्धतीनं हटवेल', असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देताच फेरीवाल्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.



याचाच प्रत्यय दादरमध्ये शुक्रवारी आला. ज्या दादर स्टेशनमधील वेस्ट परिसरात मुंबईकरांना चालायला जागा नसते, तोच परिसर आज मोकळा दिसला. या परिसरातील बरेचसे फेरीवाले उठल्यामुळे संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी रस्ता मोकळा पहायला मिळाला. त्यामुळे मनसेने दिलेला इशारा लक्षात घेता फेरीवाले चांगलेच धास्तावले आहेत.



काय म्हणाले होते राज ठाकरे

नाहीतर मनसे स्टाईल...

राज यांच्या इशाऱ्यानुसार येत्या १५ दिवसांत जर रेल्वे प्रशासनाला मुंबई शहर, उपनगरांतील रेल्वे स्थानकं, ब्रिज फेरीवालामुक्त करता आले नाहीत, तर मनसे कार्यकर्ते आणि रेल्वे प्रशासनात जोरदार धुमश्चक्री पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

चालणंही मुश्कील

एका बाजूला रेल्वे स्थानकातली गर्दी वाढताना प्रवाशांना मूलभूत सोई मिळणंही मुश्कील झालंय. रेल्वे स्थानक परिसर फेरीवाल्यांच्या विळख्यात सापडलाय. प्रवेशद्वार, रेल्वे ब्रिज सगळ्या जागा फेरीवाल्यांनी व्यापल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना नीट चालताही येत नाही, अशी स्थिती आहे.



हेही वाचा

राज यांच्या भाषणातील टाॅप 13 मुद्दे


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा