Advertisement

बीएमसी शिक्षक सेनेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दोन लाखांचा धनादेश

बीएमसी शिक्षक, शिक्षकेतर सेनेकडून कोविड १९ मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दोन लाखांचा धनादेश देण्यात आला.

बीएमसी शिक्षक सेनेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दोन लाखांचा धनादेश
SHARES

बीएमसी शिक्षक, शिक्षकेतर सेनेकडून कोविड १९ मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दोन लाखांचा धनादेश देण्यात आला. वर्षा बंगल्यावर युनियनचे नेते व सल्लागार नगरसेवक मंगेश सातमकर यांच्या नेतृत्वाखाली युनियनचे अध्यक्ष के पी नाईक यांच्या हस्ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे हा धनादेश सुपुर्द करण्यात आला.  

यावेळी खासदार विनायक राऊत, परिवहन मंत्री अनिल परब, आमदार रवींद्र वायकर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, युनियनचे मुख्य सरचिटणीस प्रकाश चव्हाण, सरचिटणीस राजेंद्र घाडगे उपस्थित होते. 

मुख्यमंत्रांनी यावेळी मुख्याध्यापक शिक्षक व कर्मचारी यांनी दिलेल्या मदतीचे कौतुक केले व आभार मानले यावेळी पदाधिकाऱ्यांनी युनियनतर्फे आणखी वैद्यकीय मदत व वस्तू वाटप करण्यात येईल असे सांगितले तसेच के पी नाईक यांनी सातवा वेतन आयोगाचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले.हेही वाचा -

शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीचे छापे

महाराष्ट्र : २०२० मध्ये बिबट्यांच्या मृत्यूच्या प्रमाणात वाढ, ५ वर्षांतील सर्वाधिक मृत्यूची नोंद

यंदा भाडेवाढ न करण्याचा बेस्टचा निर्णयRead this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement