Advertisement

मुंबईसह 'या' जिल्ह्यात उद्या शाळा, कॉलेजना सुट्टी जाहीर

शिवाय नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये असे आवाहन ही करण्यात आले आहे.

मुंबईसह 'या' जिल्ह्यात उद्या शाळा, कॉलेजना सुट्टी जाहीर
SHARES

मंगळवारी देखील मुंबई आणि इतर जिल्ह्यांना रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शाळा आणि कॉलेजला मंगळवारी (उद्या) सुट्टी जाहीर केली आहे.

मुंबई महापालिकेने तसा निर्णय घेतला आहे. मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालये यांना उद्या 19 ऑगस्ट 2025 रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याने उद्या मंगळवारी मुंबई महानगरात अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे.

या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर क्षेत्रातील (मुंबई शहर आणि उपनगरे) सर्व शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा आणि महाविद्यालये यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या नात्याने महानगरपालिकेकडून सुटी जाहीर करण्यात येत आहे. त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरातील शाळा या उद्या बंद राहातील.

शिवाय नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये असे आवाहन ही करण्यात आले आहे. गरज असल्या शिवाय कुणी ही बाहेर येवू नये असं सांगण्यात आले आहे. 

मुंबई प्रमाणे ठाणे, कल्याण, नवी मुंबई, आणि पालघर जिल्ह्यातील शाळांना ही स्थानिक प्रशासनाने शाळा आणि कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

नांदेड जिल्ह्यात ही शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळीच शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन उद्याच्या स्थिती नुसार घेईल असं स्पष्ट केलं होतं. त्यानुसार या जिल्ह्यातमध्ये शाळा कॉलेज उद्या बंद राहातील.



हेही वाचा

मुंबईकरांनो संभाळून! 19 ऑगस्टसाठी रेड अलर्ट जारी

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा