Advertisement

मुंबईतील होम क्वारंटाइन रुग्णांच्या संख्येत वाढ

कोरोनाचा दुसरीलाट आता ओसरली असली तरी सध्या संभाव्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवला जात आहे.

मुंबईतील होम क्वारंटाइन रुग्णांच्या संख्येत वाढ
SHARES

कोरोनाचा दुसरीलाट आता ओसरली असली तरी सध्या संभाव्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवला जात आहे. शिवाय, गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्ण संख्येचा आलेख कमी-जास्त होत आहे. विशेष म्हणजे होम क्वारंटाइन नागरिकांची संख्याही वाढली आहे. सध्या तब्बल ६५ हजारांहून अधिक नागरिक गृह विलगीकरणात आहेत. यामध्ये बाधित मात्र लक्षण विरहित तसेच संशयित रुग्णांचाही समावेश आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासून मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव वाढू लागला. कोरोनाबाधित रुग्ण संख्येत झपाट्यानं वाढ होत गेल्यानं गृह विलगीकरणात असलेल्या नागरिकांची संख्या ९६ हजारांवर पोहोचली. एप्रिल महिन्यात सक्रिय रुग्णांची संख्या ९२ हजारांवर पोहोचल्याने रुग्णालयांमध्ये खाटांची कमतरता जाणवू लागली. त्यामुळं ३१ मार्चपर्यंत चार लाख ८७ नागरिक होम क्वारंटाइन होते. तर १० एप्रिल रोजी ही संख्या ६ लाख २७ हजारांवर पोहोचली.

त्यानंतर कडक निर्बंध, प्रभावी लसीकरण यामुळं कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली. त्यामुळं मागील महिन्यापर्यंत होम क्वारंटाइन रुग्णांची संख्या ४० हजारांवर आली होती. मात्र, मागील काही दिवसांपासून बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. दररोज ४०० ते ४५० बाधित रुग्ण आढळून येत आहेत. शनिवारी ४८५ बाधित रुग्ण सापडले आहेत. त्याचवेळी होम क्वारंटाइन रुग्णांची संख्याही ६५ हजार ६१८ आहे.

सध्या ५३४ संशयित रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात असून, १ लाख ५६ हजार १६४ रुग्णांनी संस्थात्मक विलगीकरणात कालावधी पूर्ण केला आहे. तर ८० लाख ७८ हजार ६६३ लोकांनी होम क्वारंटाइन कालावधी पूर्ण केला आहे. गेल्या २४ तासांमध्ये बाधित रुग्णांच्या संपर्कातील ४ हजार १९२ लोकांचा शोध पालिका कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. यापैकी २ हजार ९०६ संशयित अति जोखमीच्या गटातील आहेत. तर १ हजार २८६ नागरिक कमी जोखमीच्या गटातील आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा