Advertisement

कंत्राटी व इतर असंघटीत क्षेत्रातील कामगारांचा 'कोविड योद्धा' म्हणून सन्मान


कंत्राटी व इतर असंघटीत क्षेत्रातील कामगारांचा 'कोविड योद्धा' म्हणून सन्मान
SHARES

भारताच्या ७२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे. विविध ठिकाणी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं ध्वजारोहण करण्यात आले असून, शासकीय कार्यक्रमही आयोजित करण्यात आले. शिवाय, कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार पाहता यंदा मास्क लावून, हातात ग्ल्वोज घालून व समाजिक अंतराच्या नियमांचं पालन करून ध्वजारोहन करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील कामगार भवन, वांद्रे कुर्ला सांकुल येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. महेंद्र कल्याणकर, भाप्रसे, कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.


२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधनू कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊन कालावधीत स्वत:च्या जीवाची पर्वा न करता ज्यांनी कोविड रुग्णालयात सेवा देताना कोरोनाची लागण झाली. परंतु, त्यांनी खचून न जाता त्यावर यशस्वीपणे मात केली अशा कंत्राटी व इतर असंघटीत क्षेत्रातील कामगार यांचा 'कोविड योद्धा' म्हणून डॉ. महेंद्र कल्याणकर, कामगार आयुक्त याांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मांजुनाथ ससगे, भापोसे, पोलीस उपायुक्त हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

कोविड कालावधीमध्ये लोक कलाकारांना अत्यंत हलाखीचे जीवन सोसावे लागले. अशाच लोकांपैकी मराठवाड्यातील लोक कलाकार अब्दूल सय्यद बंधू व त्यांचे सहकारी यांचा सत्कार करण्यात आला. लोक कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी हा सत्कार करण्यात आला.

कामगार आयुक्तालय, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय आणि बाष्पके संचालनालय येथील कार्यरत असलेल्या काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासकिय सेवा बजावतांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला होता, ते कालांतराने बरे झाले, अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांचा या प्रसंगी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.  तसेच लॉकडाऊन कालावधीमध्ये जे अधिकारी व कर्मचारी सातत्याने उपस्थित राहून सेवा बजावत होते अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांचा या प्रसंगी प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

मुंबईतील प्रामुख्याने फोर्टीस हॉस्पीटल, सेवन हिल्स हॉस्पीटल येथे कर्तव्यावर असणारे पांडुरंग भिकू कांबळे, रमेश गणपत पवार, अरुण अनंत वक्ते, संगेश आंबेकर, तेजस रुपवते, प्रविण भालेराव या कर्मचाऱ्यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  या प्रसंगी सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा यांचेमार्फत परेडचे आयोजन करुन झेंड्याला मानवंदना देण्यात आली. 

सदर कार्यक्रमास श्री.श्री.चू.श्रीरंगम्, सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, धवल अंतापूरकर, संचालक, बाष्पके संचालनालय तसेच कामगार आयुक्तालय, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय आणि बाष्पके संचालनालय या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा