Advertisement

नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची मुंबईत बदली

नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची परत एकदा बदली झाली आहे.

नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची मुंबईत बदली
SHARES

नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची परत एकदा बदली झाली आहे. मुंढे आता मुंबईत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव म्हणून कामकाज पाहतील. दरम्यान, कोरोनाची लागण झाल्यामुळे मुंढे सध्या आयसोलेशनमध्ये आहेत.

तुकाराम मुंढे यांच्यासह राज्यातील अनेक बड्या अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. त्यात लोकेश चंद्र यांची नियुक्ती प्रधान सचिव, जलसंपदा विभाग इथं, ए.बी. मिसाळ यांची बदली विभागीय आयुक्त, कोकण विभाग इथं तर श्रीमती अंशु सिन्हा यांची बदली सचिव, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग इथं करण्यात आली आहे.

नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी निवड झाल्यापासूनच मुंढे यांचे नगरसेवकांशी वाद सुरू झाला होता. सर्वपक्षीय नगरसेवकांचा तुकाराम मुंढे यांना विरोध होता. मुंढे यांनी शहरात कडक निर्बंध आणले होते. यावरुन नागपूरचे महापौर संदीप जोशी आणि तुकाराम मुंढे असा वादही पाहायला मिळाला होता. अखेर मुंढेची बदली झाली आणि आता ते महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदाचा कारभार सांभाळतील. मुंढे यांच्या जागी राधाकृष्णन बी यांची नागपूरच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

याशिवाय तुकाराम मुंडे यांना काही दिवसांपूर्वी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं नोटीस बजावली होती. तुकाराम मुंढे यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पातून सात जणांना नोकरीवरुन काढून टाकलं होतं. पण तुकाराम मुंढे स्वत: स्मार्ट सिटीचे नियमानुसार सीईओ झाले नव्हते. मग त्यांनी सात कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कसं काढलं? 

अशा प्रकारची याचिका सात कर्मचाऱ्यांनी नागपूर खंडपीठात दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना तुकाराम मुंढे यांना नोटीस बजावण्यात आली होती. त्याचबरोबर भाजपचे महापौर आणि नगरसेवकांनी तुकाराम मुंढे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. 

तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाल्याचं काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. याबाबत खुद्द तुकाराम मुंढे यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली होती. 'नियम आणि अटींप्रमाणे मी स्वत:ला अलगीकरण (आयसोलेट) केलं आहे. माझ्या संपर्कातील सर्वांनी करोना चाचणी करुन घ्यावी, असेही त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.



हेही वाचा

मुंबई लाइव्ह इम्पॅक्ट, धोकादायक इमारतीतील रहिवाशांना पालिकेनं हलवलं

वसई विरारमधल्या बेकायदा बांधकाम करणाऱ्या बिल्डरांना पालिकेचा झटका

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा