Advertisement

मुंबई लाइव्ह इम्पॅक्ट, धोकादायक इमारतीतील रहिवाशांना पालिकेनं हलवलं

मुंबई लाइव्हनं काही दिवसांपूर्वी हा विषय लावून धरला होता. त्यानंतर बोरिवलीतल्या एका सोसायटीत राहणाऱ्या रहिवाशांना अखेर न्याय मिळाला आहे.

मुंबई लाइव्ह इम्पॅक्ट, धोकादायक इमारतीतील रहिवाशांना पालिकेनं हलवलं
SHARES

मुंबईत अनेक भागांमध्ये आजही रहिवासी जीर्ण म्हणजेच धोकादायक इमारतींमध्ये राहतात. महापालिका अशा इमारतींना नोटीस बजावते. पण दुसरा कुठलाही पर्याय नसल्यानं अनेकांना अशाच धोकादायक इमारतींमध्ये रहावं लागतं. परंतु मुंबई लाइव्हनं काही दिवसांपूर्वी हा विषय लावून धरला होता. त्यानंतर बोरिवलीतल्या एका सोसायटीत राहणाऱ्या रहिवाशांना अखेर न्याय मिळाला आहे.

मुंबई लाइव्हनंपालिकेचं लक्ष वेधून घेतलं, तेव्हा प्रशासन कठोर पाऊल उचललं. बोरिवलीतल्या एका इमारतीला खाली करण्यात आलं आहे. इथं राहणाऱ्या रहिवाशांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आलं आहे.  शिवाय धोकादायक इमारतीला देखील पालिकेकडून पाडण्यात आलं आहे.

बोरिवलीची कपिल कुंज इमारत जीर्ण अवस्थेत होती. या जीर्ण इमारतीत लोक आपला जीव मुठित घेऊन राहत होते. इमारतीची अवस्था इतकी बिघडली की इमारतीच्या भिंतींवरुन पाणी आणि सिमेंट खाली पडू लागले. मुंबई लाइव्हनं या इमारतीत राहणाऱ्या लोकांशी संवाद साधला. ते किती वाईट परिस्थितीत जगत आहे याची बातमी दिली. बातमी केल्यानंतर, पालिकेनं या प्रकरणात लक्ष घातलं. आता इमारतीतील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. पालिकेनं रहिवाशांना दुसऱ्या ठिकाणी हलवल्यानंतर इमारत पाडली.हेही वाचा

वसई विरारमधल्या बेकायदा बांधकाम करणाऱ्या बिल्डरांना पालिकेचा झटका

'या' कारणास्तव पालिकेची पश्चिम रेल्वेला नोटीस

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा