अनधिकृत पार्किंगचा सुळसुळाट

 Anushakti Nagar
अनधिकृत पार्किंगचा सुळसुळाट
अनधिकृत पार्किंगचा सुळसुळाट
अनधिकृत पार्किंगचा सुळसुळाट
See all

अणुशक्तीनगर - अणुशक्तीनगर येथील उड्डाणपुलाखाली अनधिकृत पार्किंगचा सुळसुळाट झाला आहे. महाराष्ट् राज्य रस्ते विकास महामंडळाने येथील ऊड्डाणपुलाखालील जागेतील वहान तळाचे कंत्राट मुदतपूर्व रद्द केले आहे. तसेच उच्च न्यायालयाने आदेशान्वये या उड्डाणपुलाखालील जागेत वाहने उभी करण्यास मनाई केली आहे. असे असतानाही सर्व नियम व आदेश धाब्यावर बसवुन अनधिकृतपणे व बिनधास्तपणे पार्किंग सुरू आहे. त्यातून पार्किंग चालवणाऱ्यांचे खिसे भरत आहे. मात्र महाराष्ट् राज्य रस्ते विकास महामंडळ आणि पोलिसांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.

Loading Comments