अनधिकृत पार्किंगला ऊत

 Marine Drive
अनधिकृत पार्किंगला ऊत

खेतवाडी - सी विभागातील प्रसिध्द मोती टॉकीजजवळ अनधिकृत पार्किंगला ऊत आला आहे. टॉकीजच्या मागच्या बाजूस मोठ्या प्रमाणात अनधिकृत पार्किंग होत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. तसेच चित्रपट पाहण्यासाठी येणारे प्रेक्षक आणि परिसरातील नागरिकांनाही या कोंडीमुळे त्रास सहन करावा लागत आहे.

मोती टॉकीजचे व्यवस्थापक विनोद पांचाळ यांनी याबाबत पोलीस, नगरसेवक, पालिका प्रशासन यांच्याकडे अनेक वेळा लेखी तक्रारी केल्या आहेत. पण येथील अनधिकृत पार्किंगवर कारवाई मात्र झालेली नाही. पालिका प्रशासनाने येथे दाखवण्यापुरता 'नो पार्किंग'चा फलक लावला आहे पण वाहन चालकांकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

Loading Comments