अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा

 Lower Parel
अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा
अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा
अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा
अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा
अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा
See all

लोअर परळ - स्टेशन जवळील सीताराम जाधव मार्गावर असणाऱ्या अनधिकृत स्टॉल्स आणि बांधकामांवर पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून मंगळवारी कारवाई करण्यात आलीय. मोठ्या प्रमाणावर वाढत जाणाऱ्या अनधिकृत बांधकाम आणि स्टॉल्समुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत होता. रस्त्यावर असणाऱ्या फेरीवाल्यांमुळे तर संध्याकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असे. नागरिकांनी अनेकदा पालिकेला याबाबत तक्रारी केल्या होत्या. अखेर याची दखल घेत पालिकेच्या जी दक्षिण विभागानं अनधिकृत बांधकामांवर हातोडा मारला. दरम्यान पालिकेनं केलेली कारवाई योग्य असल्याचं सांगत मोकळा रस्ता हा नागरिकांचा हक्क असल्याचं स्थानिक रहिवासी संतोष राऊत यांनी ‘मुंबई लाइव्ह’ला सांगितलं.

Loading Comments