Advertisement

मुंबईत उष्णतेचा इशारा: IMD कडून यलो अलर्ट

तापमान 38°C पर्यंत जाण्याची शक्यता

मुंबईत उष्णतेचा इशारा: IMD कडून यलो अलर्ट
SHARES

मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णतेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. India Meteorological Department (IMD) ने मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. सोमवार आणि मंगळवारी काही भागांमध्ये उष्णतेची लाट (Heatwave) जाणवू शकते. तसेच पालघर आणि रत्नागिरीसाठी सोमवारचा इशारा देण्यात आला आहे.

8 आणि 9 मार्चलाही IMD ने उष्णतेचा इशारा दिला होता. 10 मार्च रोजी मुंबईत गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक मार्चमधील तापमान 40 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. सोमवारी सांताक्रूझ येथे 36.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले असून मंगळवारी ते 38 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात उष्ण आणि कोरडे हवामान राहण्याची शक्यता असताना, राज्यातील अंतर्गत जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सातारा, सांगली, सोलापूर, लातूर आणि धाराशिव येथे मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

उष्णतेपासून बचावासाठी उपाय

काय करावे

  • भरपूर पाणी प्या, तहान नसली तरी नियमित पाणी पिणे आवश्यक
  • ओआरएस (ORS), लस्सी, तांदळाचे पाणी (तोरणी), लिंबूपाणी, ताक यांसारखे पेय घ्या
  • हलके, सैल आणि फिकट रंगाचे कापडी कपडे घाला
  • चक्कर, मळमळ वाटल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या
  • कामगारांनी दुपारी 12 ते 3 या वेळेत उन्हात काम करू नये

काय करू नये

  • दुपारी 12 ते 3 या वेळेत बाहेर जाणे टाळा
  • अनवाणी किंवा डोक्यावर/चेहऱ्यावर झाकण न घेता बाहेर जाऊ नका
  • अतिउष्ण वेळेत स्वयंपाक करणे टाळा; स्वयंपाकघरात हवा खेळती ठेवा
  • अल्कोहोल, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड पेये टाळा, कारण यामुळे शरीरातील पाणी कमी होते
  • जास्त प्रोटीनयुक्त, मसालेदार, तेलकट आणि शिळे अन्न टाळा

हेही वाचा

मध्य रेल्वेवर 15 डब्यांच्या लोकल फेऱ्या वाढणार

अन्नात भेसळ करणाऱ्यांवर मकोका लागणार

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा