Advertisement

कुर्ला : 'या' परिसरात दर शनिवारी पाणीपुरवठा बंद

कुर्ला परिसरात सलग तीन शनिवार पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

कुर्ला : 'या' परिसरात दर शनिवारी पाणीपुरवठा बंद
SHARES

मुंबईतील कुर्ला परिसरात पाणीकपात करण्यात येणार आहे. 

कुर्ला परिसरात सलग तीन शनिवार पाणीपुरवठा बंद राहणार आहे. 13 मे 2023 शनिवारी आणि त्यानंतर 20 आणि 27 मे ला पाणीपुरवठा बंद राहणार आहेत.  पालिका प्रशासनाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. 

कुर्ल्यातील ‘एल पूर्व’ विभागातील संघर्ष नगर, लॉयलका कंपाऊंड, सुभाष नगर, भानुशालीवाडी, यादव नगर, दुर्गामाता मंदिर, कुलकर्णीवाडी, डिसुजा कंपाऊंड, लक्ष्मीनारायण रोड, जोश नगर, आजाद मार्पेट या भागात पाणीपुरवठा बंद सलग तीन शनिवार बंद राहणार आहे. 

पालिकेकडून उप जल अभियंता विभागाकडून खैरानी रोडवरील जलवाहिनीचं काम हाती घेण्यात आलं आहे.  

खैरानी रोडवरील जमिनीखालील 1200 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीचे तुकाराम ब्रिज ते जंगलेश्वर महादेव मंदिर यादरम्यान पुनर्वसन आणि मजबुतीकरणाचं काम करण्यात येणार आहे.

काम दर शुक्रवारी दुपारी 1  वाजल्यापासून रविवार पहाटे 5 वाजेपर्यंत हे काम होणार आहे. 

रविवारी पाणीपुरवठा नियमित झाल्यानंत परिसरातील सर्व नागरिकांनी पाणी उकळून पिण्याचा सल्ला विभागाने दिला आहे.



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा