Advertisement

मुंबईच्या हवेत नायट्रोजन डायऑक्साइडच्या प्रमाणात वाढ

अनेक गाड्या आणि उद्योगधंदे जीवाश्म इंधनावर अवलंबून असल्यानं मुंबईच्या हवेतील नायट्रोजन डायऑक्साइड वायूचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी वाढले आहे.

मुंबईच्या हवेत नायट्रोजन डायऑक्साइडच्या प्रमाणात वाढ
SHARES

अनेक गाड्या आणि उद्योगधंदे जीवाश्म इंधनावर अवलंबून असल्यानं मुंबईच्या हवेतील नायट्रोजन डायऑक्साइड वायूचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी वाढले आहे. 'ग्रीनपीस इंडिया'च्या ‘बिहाइंड द स्मोकस्क्रीन’ या अहवालातील हा निष्कर्ष देण्यात आला आहे. एप्रिल २०२० ते एप्रिल २०२१ या कालावधीत मुंबई, दिल्ली, बंगळूरु, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता, जयपूर आणि लखनौ या शहरांतील हवेच्या गुणवत्तेचा अभ्यास करण्यात आला.

यात कृत्रिम उपग्रहाद्वारे केलेल्या निरीक्षणानुसार मुंबईच्या हवेतील नायट्रोजन डायऑक्साइडचे प्रमाण ५२ टक्क्यांनी वाढले. दिल्लीमध्ये सर्वाधिक म्हणजेच १२५ टक्के  वाढ दिसून आली. चेन्नईमध्ये ९४ टक्के, बंगळूरुमध्ये ९० टक्के, जयपूरमध्ये ४७ टक्के, कोलकातामध्ये ११ टक्के, लखनौमध्ये ३२ टक्के आणि हैदराबादमध्ये ६९ टक्के  वाढ झाली. नायट्रोजन डायऑक्साइडमुळे हवा प्रदूषित होत असून यांमुळे श्वसन, मेंदू आणि रक्ताभिसरण यांविषयीच्या समस्या उद्भवतात.

वाहनं, वीजनिर्मिती आणि इतर औद्योगिक प्रक्रिया कोळसा, तेल, वायू यांसारख्या जीवाश्म इंधनांवर अवलंबून असल्यानं यांतून नायट्रोजन डायऑक्साइडचे उत्सर्जन होते. दरम्यान, खासगी वाहनांच्या संख्येला आळा घालणे, किमान प्रदूषण करणारी वाहतूक यंत्रणा राबवणे, सार्वजनिक परिवहन सेवेला चालना देणे, सायकल चालवण्यासाठी चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करणे, पादचारी मार्गांचे विस्तारीकरण करणे आवश्यक आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा